ने.हि.महाविद्यालयात संविधान दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांचे मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
संविधान दिनानिमित्त संविधान उद्दैशिकेचे वाचन डॉ सुभाष शेकोकरांनी केले.यानंतर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ वर्षा चंदनशिवे यांनी संविधानाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले.यावेळी महाविद्यालयांतील डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ रतन मेश्राम,प्रा निलिमा रंगारी ,अधीक्षक संगीता ठाकरे,प्रा जयेश हजारे,प्रा बंडू गेडाम,प्रा खोब्रागडे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, रोशन डांगे, सुषमा राऊत,प्रज्ञा मेश्राम इ.उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी मानले.यशस्वीतेसाठी समितीचे प्रा धिरज आतला व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.



