
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
आरोग्य संचालनालय मुंबई अंतर्गत सावलीचे ग्रामिण रुग्णालयात दि.३ ते १५ ऑगष्ट पर्यंत अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत तालुक्यातील ४० व्यक्तीनी अवयव दान करण्याचा संकल्प करुन ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
या अभियानांतर्गत अवयव दान बाबत महत्व पटवुन देण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅली काढण्यात आली, सार्वजनिक ठिकाणी अवयव दानाबाबत चर्चा करुन एका व्यक्तीने अवयव दान केल्याने 8 जीवाचे जिवनदान बनु शकते असे पटवुन सांगण्यात आले.
सदरचा जनजागृतीचा कार्यक्रम चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनात सावली ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाके व कर्मचारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहे. सावलीचे ग्रामिण रुग्णालयात खोली क्र. ५ येथे अवयव दानाची ऑनलाईन नोंदणी करण्यात सुरु असुन https://notto.abdm.gov.in/या वेबसाईट वर सुद्धा नोंदणी करता येईल. याचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामिण रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.