Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय शिवसंग्राम संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी माणसाने माणसासाठी एकत्र येण्याची गरज – जय हरी मेटे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

   जय शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता मेळावा स्थानीक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला, जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम हरी मेटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जय शिवसंग्राम संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी माणसाने माणसासाठी एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले.

  राज्यात जय शिवसंग्राम संघटनेचे जाळे विणत असतांना विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील नियुक्त्या जाहिर केल्या,सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष पदी प्रभाकर मांटे ,देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष जहिरखान पठाण ,शहराध्यक्ष पदी आजमत खान ,युवा शहराध्यक्ष पदी शंकर वाघमारे, यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र दिले.याप्रसंगी बाळासाहेब काळवने,मराठवाडा उपाध्यक्ष,नारायण टकले पाटील जालना जिल्हाध्यक्ष,सचिन खरात पाटील जिल्हा युवक अध्यक्ष जालना अजिंक्य चौधरी तालुकाध्यक्ष अंबड, विनायक भानुसे पाटील,मुबारक चाऊस, उपस्थित होते.

राम हरी मेटे म्हणाले की संघटना हे चळवळी चे श्रोत असून पक्ष आणि संघटना ह्या वेगवेगळ्या आहेत पक्षाकडे लोक आपल्या समस्या, निवेदन तक्रारी घेऊन जातात परंतु संघटना ही जनतेच्या कायम पाठीशी असते त्यामुळे पक्षा पेक्षा ही संघटनेस महत्व असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी सक्रिय राहावे असे मत व्यक्त करतांना स्व विनायक मेटे यांना स्मरण करून त्यांच्या विचाराशी जुळलेली नाळ ही तुटू देऊ नका असे आवाहन केले.

यावेळी अनिस शाह,अयुब शाह,राजू गव्हाणे,संतोस हिवाळे,शेख समीर ,साजिद खान,शेख मुबारक, सय्यद मोईन,मुजाहिद खान,यासीर खान,मोहसीन खान,शेख इम्रान आयान पठाण,आयाज खान,समीर शेख ,राजू शेख उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये