Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. उमेश वावरे(वैज्ञानिक) यांच्याकडून सावली (वाघ) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डॉ. उमेश वावरे (वैज्ञानिक) हे हिंघणघाट मधील उच्चशिक्षित समाजसेवक असून ते सामाजिक बांधिलकी म्हणून हिंघणघाट विधानसभा क्षेत्रात अनेक समाज उपयोगी उपक्रम घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता ८ ते १० मधील सावली (वाघ) येथील विद्यार्थी यांचा सत्कार मेडल व शिल्ड देऊन त्यांनी केला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र फडकाळे, शालिक एकोणकर, गोकुळ एकोणकर, देविदास सोनटक्के, प्रकाश कुकडे, तसेच लोकसेवा विद्यालय मधील शिक्षिका नवघरे मॅडम आणि रूग्ण सेवक रोशन बरबटकर उपस्थित होते व अक्षय भाऊ वानकर आणि अक्षय नवघरे,बंटी भाऊ भोयर, सारीका ताई मानकर, निलेश मानकर, गजु भाऊ कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती…
गुणवंत विद्यार्थी म्हणून उन्नती पावडे,सानिध्या मानकर, आदेश दानें,सुशांत वसाके,प्रियांशी पांडे, माही कुडे,आर्यन मानकर, अंकित देवतळे, अर्जुन ठक,श्रावण देवळकर,वेदांत अवथळे,साहिल मन्ने,तन्मय तिखट,लकी कुकडे,नैतिक एकोणकर, कृष्णा एकोणकर,हर्षल पिपंरे, खुशाल विटाळे,समीक्षा भोयर,कनक पावडे, पूर्वी ठक, तेजस मडावी यांचा मेडल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी गावकरी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली, तसेच या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा सुद्धा केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये