ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किन्हीं पवार गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली बस

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आज महाराष्ट्रात मोठ्या शहरात मेट्रो धावत आहेत तर कुठे बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे मात्र अजूनही काही गावात मुलभूत सुविधा उपलब्ध नाही, रस्ता, विद्दुत,आरोग्य,शाळा, सुविधा नाहीत काही गावात एस टी महामंडळ ची बस अजूनही पोहचली नाहीत, देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार या गावात स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच मंगळवारी (19 सप्टेंबर)ला एस टी बस पोहचली, गावात एस टी बस येताच गावकरी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला,
या गावात एस टी बस येत नसल्याने 29 विद्यार्थीनीना शिक्षण घेण्यासाठी देऊळगाव राजा येथे जाण्यासाठी प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता, नागरिकांना सुद्धा त्रास होत होता.

माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी या गावात एस टी बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महामंडळ ने बस सुरु केली आहे,गावात बस चे प्रथमंच आगमन होताच एस टी बस चे वाहक,चालक,तसेच माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला,याप्रसंगी तालुका शिवसेना प्रमुख अनिल चित्ते,विलास पवार, अरुण पवार, माधव पवार,संजू खरात,अशोक पवार, जगदीश लंके,आयुष पवार,धनंजय पवार, व गावकरी उपस्थित होते.

स्वातंत्र्या नंतर सुरू झालेली बस आता नियमितपणे सुरु ठेवावी अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये