ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुख्खात मोटार सायकल चोराकडुन ७ मोटार सायकल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट

दि. १६/१०/२०२३ रोजी पोउपनि अतुल कावळे, स्थागुशा चंद्रपूर सोबत नापोकों / अनुप, जमिर, नितेश, पोशी / प्रसाद चालक नापोशि दिनेश, रुषभ यांचे पथक पो.स्टे. कोरपना हद्दीत आरोपी शोध कामी फिरत असता गोपनिय माहीती मिळाली असता, एक इसम कोरपना बस स्टॉप परीसरात एक हिरो होन्डा स्पेन्डर मोटार सायकल, कमी किंमतीत विकण्याकरीता फिरत असुन सदर इसमांकडे वाहनाचे कोणतेही कागदपत्र नाहीत त्यावरून सदर इसमांचा शोध घेवून इसम नामे प्रदीप संजय शेरकुरे, वय २८ वर्ष रा. पारधीगुडा धोपटाळा, ता. कोरपना जि. चंद्रपुर याला येथे एक काळे रंगाची हिरा होन्डा स्पेन्डर नंबर प्लेट नसलेली ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ वाहनाचे मालकी हक्का संबंधाने कोणतेही कागदपत्र नसल्याने सदरची मोटार सायकल चोरीची असण्याची शक्यता निर्माण झाल्याने सदर वाहनाची सीसीटीएनएस प्रनाली व्दारे माहीती घेतली असता सदरची मोटार सायकल मुळ मो.सा. क्रमांक MH-३४-BC-५९६८ ही पोस्टे वरोरा जि. चंद्रपुर येथे दाखल अप क. ८४० / २०२३ कलम ३७९ भादंवि मध्ये चोरीस गेलेली आढळुन आली. त्यावरुन सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त केली.

त्यानंतर इसम नामे प्रदीप संजय शेरकुरे याला इतर गुन्हयासंबधात सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांने वरील मोटार सायकल व्यतीरिक्त आणखी काही मोटार सायकल चोरल्या असुन व नारंडा गावाजवळील गुडा येथून LED TV चोरी केल्याचे सांगितल्याने त्याचे कडुन ०७ मोटार सायकल व LED TV जप्त केल्या.

 सदर मोटार सायकल चोरी संबंधाने आरोपीने दिलेल्या माहीती वरून तसेच वाहनाचे चेसिस व इंजीन नंबर यावरून मुळ वाहनाचा क्रमांक प्राप्त करून दाखल गुन्हयांचे अभिलेख तपासले असता मोटार सायकलच्या वर्णनासमोर नमुद प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे आढळुन आले आहे.

पो. स्टे. वरोरा जि. चंद्रपूर येथे दाखल अप. क्रं. ८४०/२०२३ कलम ३७९ भांदवी मधील हिरो होंडा स्पेंडर प्लस मूळ वाहन क्रं. एम एच ३४ बी सी ५९६८ वाहन किँमत ४० हजार रुपये.,

पो. स्टे. गडचांदुर जि. चंद्रपूर येथे दाखल अप. क्रं. ३५६/२०२३ कलम ३७९ भांदवी मधील हिरो होंडा स्पेंडर प्रो. एम एच ३४ ए क्यू ५२९८ वाहन किँमत ५० हजार रुपये.,

पो. स्टे. लकडगंज जिल्हा नागपूर शहर अप. क्र.०३११/२०२३ कलम ३७९ भांदवी मधील हिरो होंडा स्पेंडर प्लस एम एच ३१ सी डी ७७१६ वाहन किँमत ४० हजार रुपये., तसेच हिरो होंडा स्पेंडर प्लस कि. ३० हजार रुपये.,

पो. स्टे. वणी जि. यवतमाळ येथे दाखल अप. क्रं. ११०४/२०२३ कलम ३७९ भांदवी मधील हिरो होंडा स्पेंडर प्लस एम एच २९ ए ए ९३६१ वाहन किँमत ४० हजार रुपये.,

पो. स्टे. वणी जि. यवतमाळ येथे दाखल अप. क्रं. १०३९/२०२३ कलम ३७९ भांदवी मधील हिरो होंडा स्पेंडर प्लस एम एच २९ झेड ८६७५ वाहन किँमत ४० हजार रुपये., हिरो होंडा स्पेंडर प्लस नंबर प्लेट नसलेली ३० हजार रुपये., एल.ई.डी. टी व्ही किँमत १० हजार रुपये असा एकुण २ लाख ८०हजार रू चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोस्टे वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंदु यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, पोना अनुप डागे, जमिर पठाण नितेश महात्में, पोशि प्रसाद धुळगंडे चानापो दिनेश अराडे, रुषभ बारशिंगे सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये