ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरबा दांडिया उत्सव समिती तर्फे भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन

विविध आकर्षक बक्षिसांचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

गरबा दांडिया उत्सव समिती भद्रावती तर्फे भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन दि. 21, 22 व 23 ऑक्टोबर 2023 ला सेवा दल मैदान नगर परिषद च्या बाजूला भद्रावती येथे आयोजित केला आहे.

या गरबा दांडिया स्पर्धेत विविध आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहे. त्यात ग्रुपमध्ये प्रथम पारितोषिक 11111 रु. द्वितीय पारितोषिक 8111रु. तृतीय पारितोषिक 5111 रु. असे आहे. तर सोलो गटामध्ये – बेस्ट किंग, बेस्ट क्वीन, बेस्ट वुमन, बेस्ट लूक, बेस्ट कपल, बेस्ट किड्स व आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहे. त्याच प्रमाणे स्पर्धेदरम्यान सोबतच प्रेक्षकांकरिता प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले आहे.

या गरबा दांडिया उत्सव समिती चे अध्यक्ष स्वप्निल मत्ते, उपाध्यक्ष – विक्रांत बिसेन, सचिव – निखिल उंबरकर, कोषाध्यक्ष – सोनल उमाटे व सदस्य अंकित तोडे, मनोज पेटकर, हर्षदा हिरादेवे, श्वेता उंबरकर, आशिष मल्लेलवार, सुनीता खंडाळकर, प्रज्ञा धुळे, सचिन पाटील, नितेश बानोत, अक्षय लोहकरे, बंटी रायपुरे, रीना बोढाले, समय हिरादेवे, प्रशिक लोणारे, सपना कुटेमाटे दांडिया उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

समस्त भद्रावतीकरांनि या गरबा दांडिया मध्ये सहभागी होऊन दांडिया खेळाडूंचा जोश वाढवावा व गरबा दांडिया चा आनंद घ्यावा असे आवाहन गरबा दांडिया उत्सव समिती भद्रावती तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये