अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधातील आंदोलनाचा तिढा सुटला
सोशल मीडियात चर्चा ; आंदोलनाचा फुसका बार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :- भारतात अग्रगण्य नावाजलेली आदित्य बिर्ला समूहाच्या आवारपुर येथील सिमेंट उद्योगा विरोधात स्थानिक दत्तक गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व गावकऱ्यांनी पक्षभेद विसरून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या बॅनर खाली एकत्रित येत १३ नोव्हेंबर पासून साखळी उपोषण नंतर १६ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करीत मोठे आंदोलन उभे केले होते संपूर्ण जिल्ह्यातून आंदोलनाला समर्थन व मोठा पाठिंबा मिळत होता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह माजी आमदार वामनराव चटप सुदर्शन निमकर, चंद्रपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, राजू झोडे, राष्ट्रवादीचे आबीद अली, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, विविध सामाजिक संघटना यांचे मोठे पाठबळ आंदोलनाला मिळाले आंदोलनाची तीव्रता वाढणार अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाला आंदोलनकर्त्याच्या सर्व मागण्या मंजूर कराव्या लागतील असे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता आंदोलनकर्त्यांच्या मुख्य मागण्यातील काही मागण्या वगळून इतर दुसऱ्याच मागण्या मंजूर करीत मोठ्या शिफातीने शिष्टाई करत आंदोलनाचा गाशा गुंडाळला लाईमस्टोनच्या वाहतूकीचा विषय, ठेकेदारी कामगाराचे बोनस तात्काळ वाढविण्याचा विषय, दत्तक गावातील बेरोजगारांना रोजगार द्यायचा विषय, सीएसआर निधी परस्पर खर्च करू नये अश्या अनेक मागण्यांना बगल देत ग्रॉस कटर मशीन, गावात फॉगिंग मशीन ने धुळ फवारणी करणे, युवकांच्या सैनिक भरती प्रशिक्षणाकरिता ग्राउंड उपलब्ध करून देणे, अश्या ज्या मागण्या नव्हत्या त्या मंजूर केल्याचे पत्र उपोषणकर्त्याला देत निंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सोडून वेगळच काही मागण्या मंजूर करण्यात आल्याने सोशल मीडियात आंदोलनाचा फुसका बार असे अनेकांचे मत दिसले
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून विकास मार्फत बिबी,नांदा, आवारपूर,नोकारी या गावांचा मोठा शाश्वत विकास केला आहे कंपनीकडून दरवर्षी आरोग्य, शिक्षण, सामाजिक विषय, रस्ते नाली,पिण्याचे पाणी, जनावरांच्या आरोग्याची काळजी, पर्यावरणाचा समतोल यासाठी भरघोस असा खर्च सीएसआर मधून केला जातो असे असतानाही दत्तक गावातील सरपंच उपसरपंच व सदस्यांनी सिमेंट कंपनी विरोधात मोठे आंदोलन उभे केल्याने कंपनीची चांगलीच दमशाक झाली होती सोशल मीडिया, वृत्तपत्र,प्रिंट मीडिया यांनी आंदोलनावरून सिमेंट कंपनीला चांगलेच धारेवर धरले होते व्यक्तिगत कारणामुळे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलन केले गेली अशीही कुजबुज अनेकांमध्ये दिसली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयमाने घेत शिष्टाई दाखवत आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करुन विशेष म्हणजे पांदण रस्त्या करिता सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याचे कंपनीने मान्य करत तोडगा काढल्याने अखेर सिमेंट कंपनी विरोधातील आंदोलनाचा तिढा सुटला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मागणीनुसार ठेकेदारी कामगार वर्गाच्या दिवाळी बोनस मध्ये कंपनीने तात्काळ मोठी वाढ न केल्याने शेवटी कामगारांना निराश व्हावे लागले अखिल भारतीय सरपंच परिषदेने अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाला १० नोव्हेंबर रोजी निवेदन देत अधिकारी वर्गाशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाहीत चर्चा करून कंपनी प्रशासन ऐकत नसल्यास तहसीलदार,जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांचेकडे तक्रार करून न्याय मागणी अपेक्षित होते परंतु थेट १३ नोव्हेंबरला आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला सरपंच संघटनेच्या आंदोलनाला जनमानसातून मोठे समर्थन मिळाले होते शेवटी पोलिस प्रशासनाच्या व अल्ट्राटेक प्रशासनाच्या मध्यास्तीने आंदोलन कर्त्यांच्या उपोषणाची सांगता झाली.