वेकोलीतील समस्यां तत्काळ निकाली काढा
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतली वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक
चांदा ब्लास्ट
वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेकोलीतील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. ही बैठक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी १६.०० वाजता वेकोलीतील VIP विश्रामगृहात झाली.
याप्रसंगी क्षेत्रीय महाप्रबंधक दातार, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, इंटक नेते के. के. सिंग, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, पप्पू शिद्धिकी यासह वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत खालील मुद्द्यांची चर्चा करण्यात आली.
ठेकेदारीमध्ये कार्यरत कामगारांच्या समस्या आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे, छट पूजा स्थळ शक्तीनगर दुर्गापूर (चंद्रपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय पत्र क्र. P१ / ३४५ / २०२३ / अतिक्रमण / १५६९ दि. ०७.११.२०२३) आणि इंटक संघटन यासंबंधी तोडगा काढणे, टेंडर्समध्ये मोठ्या प्रमाणात ५०-६०% खाली दरांवर निविदा स्वीकृतीबाबत, ३ वर्षांच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत मंजूर प्राप्त कार्यांची यादी, वेकोली खाणींमधून होणाऱ्या वायू आणि पाणी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी योजना आखण्याबाबत समिती स्थापन करणे, लालपेठ ओपन कास्टमध्ये १० महिन्यापासून कोळसा जळत असल्याबाबत काय प्रतिबंध करण्यात आला आहे. यासह विविध विषय घेण्यात आले. सर्व विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीमुळे वेकोलीतील समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.