छठ पूजा घाटांवर उपस्थिती दर्शवत आमदार किशोर जोरगेवार यांनी उत्तर भारतीय बांधवांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा
छठपुजेत घेतला सहभाग, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मिठाई वाटप
चांदा ब्लास्ट
उत्तर भारतीयांचा पवित्र सन असलेल्या छठ पुजेचे आज चंद्रपूरातील विविध घाटांवर आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर घाटांवर उपस्थिती दर्शवत छठपूजेत सहभाग नोंदवला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उत्तर भारतीयांना पवित्र छठ पूजा पर्वाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आले.
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजीत शाहा, यंग चांदा ब्रिगेडच्या विधी विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. परमहंस यादव, चंद्रमा यादव, ताहिर हुसेन, क्रिष्णा यादव, सुदामा यादव, हरिनाथ यादव, दशरथ मिठ्ठावार, गोरंग पाल, राजेश शिवधारी यादव, सुनिल सोनार, बिरेश शाहा, अक्षय मिस्त्री, जितु गुप्ता आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने परप्रांतातील विविध धर्मीय नागरिक येथे स्थायी झाले आहे. यात उत्तर भारतीय समाजाचीही संख्या मोठी आहे. दरवर्षी येथे उत्तर भारतीयांचा पवित्र उत्सव असलेल्या छठ पुजेचे मोठ्या उत्साहात आयोजन केल्या जात असते. यंदा ही उत्तर भारतीय समाजाच्या वतीने चंद्रपूरातील विविध घाटांवर छठ पुजेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी लालपेठ शिव मंदिर घाट, पागल बाबा नगर घाट, लालपेठ घाट या सह विविध घाटांवर उपस्थिती दर्शवत छठ पुजेत सहभाग घेतला. यावेळी सुर्याला अर्घ अर्पण करुन आमदार किशोर जोरगेवार यांनी पुर्जा अर्चना केली. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी मिठाई वाटप करुन उत्तर भारतीयांना छठपुजा पर्वाच्या शुभेच्छा दिल्यात.