ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डब्ल्यूसीएल वणी क्षेत्रातील कामगार वसाहतींमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) – WCL वणी क्षेत्रातील घुग्घुस येथील काही कामगार वसाहतींमध्ये मठमैला (घाणेरडे) आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे कामगार कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी आहे, मात्र भीतीपोटी ते उघडपणे आवाज उठवू शकत नाहीत.
स्थानिकांचे म्हणणे आहे की जलपुरवठा विभाग आणि सिव्हिल विभागाच्या निष्काळजीपणामुळे मजूर कुटुंबांना हाल सोसावे लागत आहेत. क्षेत्रीय व्यवस्थापन, एरिया मॅनेजर तसेच पाचही युनियनचे नेते या गंभीर प्रश्नावर मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. कामगारांच्या समस्यांकडे ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कामगार कुटुंबांनी प्रशासनाकडे तातडीने शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.