ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज संघटन आवश्यक – अँड सातपुते 

धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीची बैठक ; शिक्षक आमदार यांचीही उपस्थिती 

चांदा ब्लास्ट

विदर्भात धनोजे कुणबी समाजाची संख्या जास्त आहे. समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेती तसेच समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक उन्नतीचा विचार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित होणे आवश्यक असल्याचे मत मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी येथील धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर येथे आयोजित समाज मध्यवर्ती समितीच्या सभेत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

           सदर सभेला अतिथी म्हणून नागपूर येथील समाज मंडळाचे अध्यक्ष मधुकर ढोके, चंद्रपूरचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, गडचिरोलीचे रामकृष्ण ताजने, बुट्टीबोरीचे मुकुंद रोडे, मार्डी येथील सुभाष पिंपळशेंडे, गोंडपिपरीचे प्रफुल्ल आस्वले, राजुरा येथील दौलतराव भोंगळे, पांढरकवडा येथील समाधान धानोरकर, यतमाळचे अँड. संतोष कुचनकर, वरोराचे सचिव पुंडलिक कौरासे, भद्रावतीचे पांडुरंग टोंगे, प्रा. धनराज आस्वले उपस्थित होते.

       यावेळी गडचांदूरचे सचिव निलेश ताजने यांना ‘लोकमत’चा ग्लोबल महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

      केंद्रीय समिती ही 2018 मध्ये गठित करण्यात आली तेव्हापासून अँड. पुरुषोत्तम सातपुते समितीचे अध्यक्ष असून कमेटीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडली जात आहे. समितीने समाज संघटित ठेवण्यात मोलाचे काम केले आहे.

     नियोजित सभेला समाजाच्या 18 कमिटींपैकी 14 कमिटीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व गणमान्य समाजबांधव उपस्थित होते. यावेळी बुटीबोरी, सावनेर मार्डी येथील समाजाची नवीन मंडळे स्थापन करण्यात आलीत.

       यावेळी मान्यवरांनी समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रत्येकांनी कटिबद्ध राहणे व ‘गाव तिथे समाज शाखा’ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थिती दर्शवून नागपूर येथे 10 आक्टोबरला होणा-या ओबीसी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

     यावेळी राज्यस्तरीय उपवर-वधू व शेतकरी मेळावा संदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय समितीचे सचिव पवन राजुरकर, संचालन अँड. विलास माथनकर तर आभारप्रदर्शन पांडुरंग टोंगे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये