ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी आरमोरी रोडवर अपघातात १ ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

आरमोरी रोडवरील प्रज्वल बारसमोर शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मागंली येथील अजय आनंदराव कार (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय कार हा ब्रम्हपुरीतील प्रशांत पिलारे यांच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे तो शनिवारी सकाळी घरून कावासाकी मोटारसायकलने ब्रम्हपुरीत आला होता.

संध्याकाळी साडेसहा वाजता तो मागंलीकडे परतत असताना समोरून येणाऱ्या मिनी पिकअप (क्रमांक MH-34 BZ-3153) ने भरधाव वेगात व निष्काळजीपणे त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत अजय कार गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित रोशन राऊत यांनी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत अजय कार हा आनंदराव तुकाराम कार यांचा मुलगा असून, त्याच्या निधनाने मागंली गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी संबंधित मिनी पिकअप चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 281 तसेच मोटार वाहन कायदा 1989 अंतर्गत कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये