ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तहसील कार्यालय येथे महसुल लोकअदालत

महसूल विषयक बाबी, प्रलंबित तक्रारीचे होणार त्वरित निराकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर २५ रोजी भद्रावती तहसील कार्यालय तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय घोडपेठ, भद्रावती, नंदोरी, मागली, चंदनखेडा व मुधोली येथे महसूल लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांच्या महसूल विषयक बाबी, प्रलंबित तक्रारी व अर्जांचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या काही तक्रारी अथवा समस्या असल्यास त्या अर्जाच्या स्वरूपात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर यांनी केले आहे.

लोकअदालतीत महसूल विभागाशी संबंधित फेरफार, रस्ते विषयक प्रश्न, सातबारा अभिलेखातील दुरुस्ती, नावे दुरुस्ती, अपील क्षेत्रातील बाबी तसेच संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचे लाभार्थी असलेल्या अर्जांचे निकाली काढणी केली जाणार आहे. तसेच आधार प्रमाणिकरण, अॅग्रीस्टॅक फार्म आयडी यांसारख्या शासकीय योजनेशी संबंधित प्रश्नांचेही मार्गी लावण्यात येणार आहे.

तहसील कार्यालय, भद्रावती येथे लोकअदालती दरम्यान अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, नायब तहसीलदार मनोज आकलुनवार, मधुकर काळे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये