जिवती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमिनीच्या निर्वणीकरणात
महत्वपूर्ण प्रयत्नाबाबत हंसराज अहीर यांचा जिवतीवासियांद्वारे सन्मान

चांदा ब्लास्ट
अहीर यांनी मानले मा. मुख्यमंत्री च महसुलमंत्र्यांचे आभार
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट असलेल्या हजारो हेक्टर जमिनीबाबत या तालुक्यातील इतर मागास व अन्य प्रवर्गातील नागरिकांच्या प्राप्त तकारीनुसार निर्वगीकरण (डीफोरेस्टेशन) करून व शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी माजी आमदारद्वय अॅड. संजय घोटे व सुदर्शन निमकर यांच्या उपस्थितीत सप्टेंबर-२०२४ रोजी वेणु गोपाल रेड्डी प्रधान सचिव वने महाराष्ट्र शासन, जानेवारी २०२५ रोजी उच्चस्तरीय अधिकारी वनविभाग, एप्रिल-२०२५ रोजी डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक, अवर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालयीन स्तरावरील वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय अधिकारी, विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर, रामगांवकर जिल्हा मुख्य वनसंरक्षक श्रीकांत देशपांडे, अपर जिल्हाधिकारी, माने उपविभागीय अधिकारी राजुरा, सेंबटवाड तहसिलदार जिवती या अधिकाऱ्यांच्या समवेत वेळोवेळी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी घेतली होती.
या सुनावणीमध्ये सन २०१५ मधील महसुल व वनविभागाचे पत्र परत घेवून या ज्वलंत समस्येवर शीघ्र तोडगा काढण्याबाबत आश्वस्त करण्यात आले होते. तसेच या कार्यवाहीबाबत हंसराज अहीर यांनी आयोगाच्या माध्यमातून वारंवार आढावा घेतला होता त्यांच्या लोकसभा मतदार संघातील हा विषय असल्याने ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी मा. मुख्यमंत्री, महसुलमंत्री, केंद्रीय वनमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री यांचेशी सुध्दा बृहत पत्रव्यवहार व वेळोवेळी बैठका घेत, त्यांनी हा विषय मार्गी लावण्याकरिता विशेष प्रयत्न केले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धोरणात्मक निर्णय घेत जिवती तालुक्यातील साडेआठ हजार हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून निर्वणीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून न्याय दिल्याने जिवती तालुक्यातील भाजपाच्या शिष्टमंडळाद्वारे सर्वश्री भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, शहराध्यक्ष राजेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव केशव गिरमाजी, महामंत्री भिमराव पवार, अशपाक शेख, गोविंद टोकरे, चंद्रकांत घोटके, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे यांचेसह इतरांनी दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून शाल व पुष्पगुच्छ देवून हंसराज अहीर यांचा सन्मान करीत जिवतीवासियांच्या वतीने आभार मानले.
सुमारे ४० हजार हेक्टर जमिनी वनक्षेत्रात असल्या तरी, राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रारंभिक स्तरावर ८६५० हेक्टर जमीनी वनक्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळणार आहे. शासनाने या निर्वणीकरण कार्यवाहीचे पत्र नागपूर विभागीय आयुक्त व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविले असून, ही प्रकीया जलदगतीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिवती तालुक्यातील शेतजमिनी वनक्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे १९७२ व १९९१ मध्ये महसुल विभागाद्वारे भोगवटा वर्ग २ चे पट्टे मिळूनही या पट्टयांचे फेरफार नियमाच्या कचाट्यात अडकले होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासूनही या शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागत होते.
हंसराज अहीर यांनी ही समस्या गांभिर्याने घेवून हा प्रश्न शासन स्तरावरून धसास लावण्यात यश मिळविले असून उरलेल्या जमीनी व वसाहतीबाबत त्यांचे प्रयत्न सतत सुरू असल्याने त्यांच्या लोकहिताच्या या कार्याबद्दल जिवती तालुक्यातील नागरिकांनी व सन्मानकर्त्यांनी आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हंसराज अहीर यांनी मी सुध्दा या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले आहे.