ग्राहक जागृती व अधिकार जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथील इंग्रजी विभाग व जागृत ग्राहक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्राहक जागृती व अधिकार जनजागृती” या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. ए. चंद्रमौली यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून मा. दीपक देशपांडे व मा. रमेश डांगरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत वासाडे होते. संचालनाची जबाबदारी डॉ. संगानंद बागडे यांनी नेटकेपणे पार पाडली, तर आभारप्रदर्शन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले.
कार्यक्रमामध्ये ग्राहकांचे हक्क, फसवणुकीपासून संरक्षण, माहितीचा अधिकार आणि ग्राहक म्हणून आपली जबाबदारी यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या विषयावर उदंड प्रतिसाद दिला व अनेक प्रश्न विचारून सहभाग दर्शविला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रेरणा मोडक, डॉ. विजयसिंग पवार, डॉ. दिवाकर उराडे, व डॉ. सचिन चौधरी यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक सजगता निर्माण करण्यास उपयुक्त ठरला, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली.