ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये रविवारी दारू दुकाने बंद करण्याच्या मागणीवरून प्रशासनाविरोधात संताप

बीएसपीचा इशारा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपुर) : घुग्घुस शहरातील देशी दारू दुकाने रविवारी बंद ठेवण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे दि. ६ ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे महिलांसह मोठे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बातमी सर्व प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध झाली होती.

तथापि, एवढा मोठा आंदोलनाचा आवाज उठूनही प्रशासनाने आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून “प्रशासन गप्प का आहे? दारू माफियांचे पैसे खात आहे काय?” असे प्रश्न नागरिकांकडून सर्रास विचारले जात आहेत.

दर रविवारी घुग्घुस शहरात मोठा आठवडी बाजार भरतो. महिलांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, दारूच्या दुकानासमोर दारुड्यांची गर्दी होत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो तसेच शहराच्या शांततेला बाधा निर्माण होते.

या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुरला यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, घुग्घुस शहरातील दोन्ही देशी दारू दुकाने रविवारी बंद करण्याचे आदेश तातडीने देण्यात यावेत.

जर आवश्यक ती कारवाई झाली नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्या विरोधातही आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने नागरिकांचा आवाज ऐकून तातडीने दारूबंदीची कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढेल आणि मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडेल, असा इशारा बीएसपीकडून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये