“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणारी महिला गुन्हेगार व तिचा अल्पवयीन मुलगा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून आरोपीता ज्ञानेश्वरी संजय कोम्पलवार, वय 41 वर्ष, रा. कोरा, तह. समुद्रपुर ह.मु. महाकाली नगरी, नंदोरी रोड हिंगणघाट हिचेवर तिचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपीताचे राहते घरी गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर महिला आरोपीता हि तिचे अल्पवयीन मुलाचे मदतीने गांजा मालाची वाहतूक करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, दोघांचेही ताब्यातुन, 01 किलो 88 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा सि.डी. 100 मोटर सायकल क्र. एम.एच. 32 ई. 7797 सह जु.कि. 71,760 रू चा मुद्देमाल जप्त करून, महिला गुन्हेगार व तिच्या अल्पवयीन मुलगा यांचेविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, निलीमा उमक, रवि पुरोहित, अक्षय राऊत, राहुल लूटे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.