ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती देऊळगाव राजा येथे बस स्थानक परिसरात शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज कायंदे,शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णु झोरे,तालुका अध्यक्ष गजानन काकड,तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजीव इंगळे,शहर अध्यक्ष विजय खांडेभराड,प्राचार्य देशमुख,प्रा.अशोक डोईफोडे,अशोक काबरा, गणेश डोईफोडे, सुभाष वाघ,शर्मा सर,शौकत भाई,धोंडू भाई बावरे,मुबारक खान,बाबासाहेब कासारे,जाहीर भाई,हिरामंद जमदाडे आदि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.