ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजकारणाच्‍या माध्‍यमातून समाजकार्य करणारे युवा नेतृत्‍व सुरज पेदुलवार – सुधीर मुनगंटीवार

नेत्रचिकित्‍सा शिबिराचे यशस्‍वी आयोजन

चांदा ब्लास्ट

राजकारणाच्‍या माध्‍यमातून समाजसेवा करण्‍याचे व्रत घेऊन सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक क्षेत्रामध्‍ये अल्‍पावधीतच कुठलाही राजकीय वारसा नसताना आपले कार्य यशस्‍वीपणे करणारे व्‍यक्‍तीमत्‍व सुरज पेदुलवार आहेत, असे मत राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर-वर्धा जिल्‍ह्याचे मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले.

दि. १९ नोव्‍हें. २०२३ रोजी सुरज पेदुलवार यांचे वाढदिवसानिमित्‍त श्रीराम चौक, भानापेठ वार्ड येथे भव्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाढदिवसानिमित्‍त नेत्रचिकित्‍सा शिबिर आयोजित करुन गरजुंना लाभ उपलब्‍ध करून दिला, याबद्दल आनंद व्‍यक्‍त केला. तसेच ते पुढे म्‍हणाले, राजकारणाच्‍या माध्‍यमातून समाजसेवा करण्‍याचे व्रत घेऊन सामाजिक, शैक्ष्‍ाणिक व सांस्‍कृतिक क्षेत्रामध्‍ये सुरज पेदुलवार यांनी अल्‍पावधीतच आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाचा अमीप ठसा उमठविला आहे. या नेत्रचिकित्‍सा शिबिरामध्‍ये ३५० रुग्‍णांची नेत्रचिकित्‍सा करण्‍यात आली. ज्‍या रुग्‍णांना तपासणी दरम्‍यान चष्‍मे लागले आहेत, त्‍यांना लवकरच चष्‍मे वितरीत करण्‍यात येणार आहे.

तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत सफाई कामगारांचा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते शॉल, श्रीफळ व दिवाळी भेट देऊन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मतदान ओळखपत्राची देखिल वितरण करण्‍यात आले. नेत्रचिकित्‍सा शिबिर डॉ. चौधरी व डॉक्‍टरांच्‍या टिमने पार पाडले. हा कार्यक्रम सुरज पेदुलवार मित्र परिवारातर्फे आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी प्रामुख्‍याने शशांक काकडे, भुषण पाटील, अनुराग मिश्रा, ओम अडगुरवार, विष्‍णु क्षिरसागर, सुनिल मिलाल, राहूल नगराळे, सोहेल शेख, हेमंत बोमीडवार, विक्‍की मेश्राम, कुणाल क्षिरसागर, अरमान पठाण, अथर्व हर्षे, शिवम सुगरवार, भावेश जाधव, रुपील भोस्‍कर, जयेश बोकडे, मोहन चौधरी, प्रशांत चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये