ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य महाविद्यालयात सिकलसेल तपासणी शिबिर

एम. एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक विद्यार्थांच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर व राष्ट्रीय आरोग्य अभियान – मुंबई, महाराष्ट्र राज्य विभाग जि.प.चंद्रपूर तसेच वैद्यकिय व मनःचिकित्सक समाजकार्य अंतर्गत सिकलसेल तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम १३ डिसेंबर रोजी घेण्यात आला.
सिकल पेशी रक्तक्षय हा लाल रक्तपेशींचा आनुवांशिक विकार आहे जो शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या प्रथिनांवर म्हणजेच हिमोग्लोबिनवर परिणाम करतो. तथापि सिकल पेशी रक्तक्षय असलेल्या लोकांमध्ये जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे लाल रक्तपेशी चंद्रकोर किंवा “सिकल” (विळ्यासारख्या) आकाराचे होतात.
 कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या ( प्रभारी ) डॉ. जयश्री कापसे यांनी सिकलसेल अजाराविषयी विद्यार्थ्याना महत्वाचे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील  सिकलसेल समुपदेशक भारती तीतरे, सिकलसेल टेक्निशियन अर्चना गावंडे उपस्थित होते. ११ ते १७ डिसेंबर सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती सप्ताह पाळला जातो. अर्चना गावंडे यांनी सिकलसेल ची तपासणी घेतली. तसेच भारती तीतरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात ७० विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी तपासणी केली. संचालन प्रीतम दूर्गे याने केले तर आभार महिमा मोहुर्ले हिने व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये