गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस पुणे येथून अटक

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे कि, यातील नमूद आरोपीने सौरभ नरेश खोंडे रा. गणेश नगर वर्धा अल्पवयीन मुलगी हिचेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचेशी जवळीक साधल्याचे मुलीच्या नातेवाईकांचे लक्षात आल्यानंतर तीला नागपूर येथे तिच्या आजी कडे नेऊन ठेवले होते.

परंतु आरोपीने दि.21.10.2021 रोजी तीला फुस लावून नागपूर येथून तिच्या पालकाचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले होते.त्यामुळे फिर्यादी नामे श्रीमती गंगुबाई खापरे रा. नागपूर यांचे तक्रारी वरून पो. स्टे. तहसील, नागपूर शहर येथे अप. क्र.906/21 कलम 363 भा. दं. वि.सहकलम पोक्सो अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्या नंतर आरोपीची आई  रंजना नरेश खोंडे रा. गणेश नगर, वर्धा यांनी तिचा मुलगा सौरभ खोंडे हा मिसिंग झाल्याबाबत पो. स्टे. वर्धा शहर येथे तक्रार दिल्याने दि.26.10.2021 रोजी मिसिंग क्र.73/21 नोंद करण्यात आली होती.

त्या नंतर नागपूर पोलिसांनी त्यांचे गुन्ह्याचे तपासात यातील अल्पवयीन मुलीस पुणे येथून आणून तिला तिच्या आईचे स्वाधीन केले होते परंतु आरोपी मिळून न आल्याने तो फरार होता.

त्या नंतर आरोपीने आठ दिवसातच पुन्हा संधी साधून तीला फूस लावून दि.20.03.2022 रोजी वर्धा येथून तिच्या पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन करून फरार झाला होता. त्यामुळे दि.21.03.2022रोजी पो. स्टे. वर्धा शहर येथे वरील गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता. तेव्हा पासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता. नागपूर व वर्धा पोलिस त्याचा सतत शोध घेत होते परंतु त्याचे बाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने तो दोन्ही गुन्ह्यात घटनेपासून फरार होता. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला.

मा . पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार दि.01.11.2023 ते 31.11.2023 पर्यत ऑपरेशन मुस्कान राबवून जास्तीत जास्त बालके व महिलांचा शोध घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर शोध मोहिमेदरम्यान यातील आरोपी व मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीवरून त्यांचे शोधार्थ पुणे येथे पोलीस पथक पाठविण्यात आले होते. त्यांनी पुणे शहरातील चाकण, निगोजे, कुरुळी व आंबेठाण परिसरात शोध घेतला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी हे दोघेही पुणे शहर हद्दीतील पो स्टे. म्हाळुंगे हद्दीतील ग्राम – आंबेठाण गाव, ता. खेड, जि. पुणे येथून एका किरायाचे रूम मद्धे मिळून आलेत. त्यांना ताब्यात घेऊन तपास कामी वर्धा येथे आणून आरोपीस रितसर अटक करून पीडित मुलीसह पुढील तपासकामी पो. स्टे. वर्धा शहर येथे हस्तान्तरीत करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा, वर्धा, पो. उप नि बालाजी लालपालवाले यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे, शबाना शेख,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, दिनेश बोथकर व अक्षय राऊत यांनी पार पाडली आहे.
करिता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सादर आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये