ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील कर्मचारी व शिक्षकांनी पाळला काळा दिवस

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे निवेदन

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली : राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरी लागलेल्या सर्व कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याच्या निषेधार्थ आज मंगळवारी शिक्षकासह सर्व सरकारी कर्मचारी यांनी काळा दिवस पाळून येत्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन लागू न केल्यास नागपूर विधानभवनावर १२ डिसेंबर २०२३ ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 10 लाख पेन्शन शिलेदाराच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर जिल्हा सचिव लखन साखरे यांनी दिली.

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना १९८२ पासून लागू असलेली जुनी पेन्शन ३१ ऑक्टोबर २००५ ला एक जीआर काढून बंद केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झाले. त्यामुळे ३१ ऑक्टोबर हा दिवस सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासाठी काळा दिवस आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कर्मचारी यांनी मंगळवारी काळी फीत लावून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, यासाठी काळा दिवस पाळला. सोबतच १२ डिसेंबर २०२३ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर जनक्रांती मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय मिटपल्लीवार,जिल्हा सचिव लखन साखरे,जिल्हा प्रतिनिधी प्रा.राजू केदार,आयटी सेल प्रमुख प्रा.शेखर प्यारमवार,तहसील विभाग प्रमुख गवई, सावली केंद्र संघटक प्रवीण येरमे,सुधाकर मेश्राम,प्रवीण काटपल्लीवार, प्रा.प्रकाश गेडाम, प्रदीप कोहळे, सुधीर जीवतोडे, कु.वनिता गेडाम,कू.रिंकी कोतपल्लिवार,कू.उर्मिला बारेकर, कू.प्रसन्ना अल्लुरवार,रवींद्र कन्नाके,धर्मरवी वणकर,मयूर मुस्कावार,संजय भोयर,संदेश मानकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये