ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार श्री.सुभाषभाऊ धोटे साहेब मित्रपरिवार तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यामानाने वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे.

त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) मधून प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर व त्यांची चमू हजर राहणार आहे, डॉक्टर त्यांचा स्टाफ मिळून सुमारे 100 स्पेशलिस्ट येणार आहेत त्याचप्रमाणे आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज दंत आजार मुखाचे आजार तपासणारी गाडी सुद्धा येणार आहे, तसेच स्तनांच्या आजार तपासण्यासाठी मॅमोग्राफी वाहन सुद्धा उपलब्ध राहणार आहे . तसेच हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ,मानसिक रोग तज्ञ, किडनी रोग तज्ञ यकृताचे आजार,उच्च रक्तदाब मधुमेह, मोतीबिंदू,काचबिंदू आजार कान नाक घसा तज्ञ, डोळ्यांचे आजार,पोटाचे विकार, तज्ञ शस्त्रक्रिया हर्निया हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर सुद्धा सदर शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

तसेच सदर शिबिरामध्ये प्रत्येक रुग्णाचे आभा व पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड सुद्धा काढून देण्यात येईल तरी येताना आपले आधार कार्ड सोबत घेऊन यावे, त्याकरता कृपया जिवती व कोरपणा तालुक्यातील सर्व गरजू आजारी रुग्णांनी रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहापर्यंत नोंदणीसाठी वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे पाठवण्यात यावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये