नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सरोज चांदेकर, आशु फुलझेले, स्मिता वैद्य, अस्मिता दोणारकर, चंद्रशेखर देशमूख, सोनाली आंबेकर आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत नगाजी महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त नाभिक समाजाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री नगाजी महाराज मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा पठाणपूरा मार्गे होत जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा मंदिरात पोहोचली.
दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया जवळ यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शित पेयाची व्यवस्था करण्यात आली होती.