ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलासाठी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन कायम

घरकुलाचा लाभ मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

आमरण उपोषणाचा दिला इशारा

तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामिण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जिबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापूरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. मात्र अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जिबगाव येथील सरपंच, सचिव व पं.स. अधिकारी यांनी संगणमताने आम्ही पात्र असतांना डाववले असुन अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

या संदर्भात अनेकदा प्रशासनाला निवेदन देवूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी घरकुलासाठी पंचायत समितीसमोर कुटुंबासह ठिया आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात ०६ वर्षाच्या मुलांचाही सहभाग असल्याचे दिसुन आले आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती दिली.

ग्रामिण भागातील गोरगरीब दारिद्रय रेषेखालील जनतेला हक्काचे घर असावे या उदात्त हेतुने शासनामार्फत मोदी आवास घरकुल योजना कार्यान्वीत करण्यात आली.त्यात विधवा, परितक्याय अपंग यासह ज्यांना निवारा नाही अशा लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने घरकुलाचा लाभ देण्याचे निकष आहे.

मात्र, जिबगाव येथील ग्रामपंचायतीने हेतुपरस्पर आम्हाला डावलून घरकुलाचा लाभ दिला नसल्याने आमच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही ठिया आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन करीत झोपी प्रशासन ला जागा करण्यासाठी आंदोलन करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिल्या आहेत. आमची मागणी पुर्ण न झाल्यास यापुढे आंदोलन तिव्र करुन भिकमांगो, मुंडण व अर्धनग्न आंदोलन करुन प्रशासनाला जागे करणार अशी माहिती देण्यात आली होती.

मात्र,सात दिवस लोटुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने २६ तारखेला भिकमांगो आंदोलन करण्यात आले तर २७ तारखेला मुंडण आंदोलन करण्यात आले तर २८ तारखेला अर्धनग्न आंदोलन करण्यात येवुन प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन सुरू असुन प्रशासन गाळ झोपेत असल्याने येणाऱ्या दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये