ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणुन होणार शासनाकडून सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

मूल : स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील उप विभागीय अभियंता प्रशांत चंद्रकांत वसुले यांना सन 2021-22 या कालावधीमध्यें अभियंता म्हणून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शासनाने वैयक्तिक पुरस्कार जाहीर केला असून येत्या अभियंता दिनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यांत येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्ते, पुल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करण्यांत येतात त्यांची संकल्पना तयार करून व इतर माध्यमांचा उपयोग करून संकल्पनाचित्रे बनवताना तसेच सार्वजनिक इमारतीच्या विद्युतीकरणाची काम करतांना तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अश्या अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायदयाची ठरते.

अश्या अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन भारतरत्न सर विश्वेश्वरया यांच्या 15 सप्टेंबर या जन्मदिनी पाळण्यात येणा-या अभियंता दिवशी त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देवून सन्मान करण्यांत येते. याकरीता 8 जानेवारी 2018 पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे सेवारत असलेले उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांची शासनाने सन 2021-22 या वर्षाकरीता उत्कृष्ट अभियंता म्हणून निवड केली आहे.

सेवेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी उपविभागातंर्गत विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक बांधकाम पुर्ण केली असून जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यात प्रशांत वसुले यांचे योगदान तेवढेच महत्वाचे आहे. नवीन प्रशासकिय इमारत, स्व. कर्मवीर कन्नमवार सांस्कृतिक सभागृह, पत्रकार भवन, तालुका क्रिडा संकुलाचा विकास, नगर परिषदेचे निर्माणाधिन असलेले भव्य व्यापारी संकुल, नगर परिषदेची दोन मजली शाळा इमारत याशिवाय अलीकडेच लोकार्पण झालेले विश्राम गृह अश्या अनेक वास्तुंच्या निर्मिती शिवाय तालुक्यात वाहणा-या नदयांवरील पुल, चिरोली-सुशी आणि मारोडा-भादुर्णी मार्गावर निर्माण करण्यांत आलेले पुल कम बंधारे अश्या बांधकामाच्या अनेक योजना उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी सहकारी अभियंत्याच्या सहकार्याने पुर्णत्वात नेल्या असून तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रशांत वसुले यांचा मुंबई येथे होणा-या शासकिय कार्यक्रमात सन्मान करण्यांत येणार असल्याने मूल तालुक्याच्या लौकीकात पुन्हा भर पडली आहे. हे विशेष

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये