भद्रावती पोलीस ठाण्यातील दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रमोशन
सर्वांना भद्रावती पोलीस ठाण्यात दिला पदभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
भद्रावती पोलीस ठाण्यातील दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रमोशन करण्यात आले आहे. प्रमोशन करण्यात आल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना भद्रावती पोलीस ठाणे अंतर्गतच पदभार देण्यात आला आहे. भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये आधी पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रकाश देरकर व प्रकाश खडे यांना सहाय्यक फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
तर भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत आधी नायक पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या रामप्रसाद नैताम, अजय झाडे, गणेश सुर, धर्मराज मुंडे, राकेश बंजारीवाले, जगदीश जीवतोडे, मोरेश्वर पिदुरकर व अनुप आष्टनकर यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्याबद्दल भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार बीपीन इंगळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.