ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्गोत्सव हा नारी शक्तीचा जागर : आ. प्रतिभा धानोरकर

भद्रावती येथे सार्वजनिक महिला मंडळांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

दुर्गोस्तव व शारदोत्सव हा खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा जागर असून या काळात नारी शक्ती दिसून येते, शहरातील सार्वजनिक महिला मंडळांनी नवरात्र, दुर्गोत्सव तथा शारदा उत्सवाची परंपरा अबाधित ठेवली असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. दिनांक 26 व 27 ला शहरातील सार्वजनिक शारदा तथा दुर्गा विसर्जनाचा विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

यानिमित्त काँग्रेस तर्फे गांधी चौकात शहरातील सार्वजनिक शारदा व दुर्गा महिला मंडळाचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वंदना धानोरकर, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, मनोहर नागपुरे, सरिता सूर, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, संदीप कुमरे, तनु शेख, प्रतिभा सोनटक्के, जयश्री दातारकर, कविता सुपी, रुक्साना शेख, कोमल नागोसे आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील सर्व शारदा तथा दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुका गांधी चौकात पोहोचल्यानंतर प्रत्येक महिला मंडळाचे अध्यक्ष तथा सचिवांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शहरातील सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्वागत सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी निखिल राऊत, रितेश वाढई, छोटू धकाते, महेश कोथळे, सुयोग धानोरकर आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये