ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक इलियास हुसेन कोल इंडिया चे सर्वोत्कृष्ट महाप्रबंधक पुरस्काराने होणार सन्मानित

1 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील कोल इंडिया मुख्यालय अध्यक्षांच्या हस्ते होणार सन्मान

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वेकोली माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक इलियास हुसैन यांना संपूर्ण कोल इंडियामध्ये 2023 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट महाप्रबंधक पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल इंडियाच्या 49 व्या स्थापना दिनी 1 नोव्हेंबर रोजी कोल इंडियाच्या मुख्यालय कोलकाता येथे कोल इंडिया चे अध्यक्ष पी.एम. प्रसाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असुस पी.एम प्रसाद आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वच्छता, पर्यावरण, यंत्रांची तांत्रिक देखभाल, अपघातमुक्त कोळसा उत्पादन आणि उद्दिष्ट महाप्रबंधक कार्यक्षमता अशा विविध बाबींच्या आधारे हा पुरस्कार घोषित केला जातो. सन 2023 मध्ये कोल इंडियाने एकूण पाच पुरस्कार जाहीर केले. वेकोली ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक महाव्यवस्थापक इलियास हुसेन माजरी क्षेत्र, जॉर्ज मॅथ्यू सर्वोत्तम विभाग प्रमुख (विक्री आणि विपणन) नागपूर मुख्यालय, आणि वेकोली मुख्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विभागाचे तीन उत्कृष्ट महाव्यवस्थापक निली पुरुषोत्तम, कल्लुरी रामकृष्ण रेड्डी, वैभव कुमार यादव. सुद्धा सन्मानित करण्यात आले.

वेकोलि माजरी परिसराचे महाव्यवस्थापक सर्वोत्कृष्ट महाव्यवस्थापक पुरस्कार मिळाल्याबद्दल वेकोलिचे अधिकारी, कामगार संघटना व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये