ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मागील 02 महिण्यापासुन पसार असलेले मुख्य आरोपी व त्याचा साथीदार (दोन्ही अट्टल गुन्हेगार) स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 29/04/2024 रोजी फिर्यादी हा त्याचा मित्राचा बर्थडे पार्टीमध्ये आला असता आरोपीतांनी गैर कायदयाची मंडळी जमवून सदर ठिकाणी आरोपी याची मैत्रीण बर्थडेला कशी आली या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून आरोपी यांनी त्यास हाताबुक्यानी मारहाण करून त्या ठिकाणी ठेवून असलेली काचेची शिशीने फिर्यादीचे डोक्यावर मारून गंभीर जखमी केले, तसेच मुख्य आरोपी यश पराते याने त्याचे हातात असलेले चाकुने फिर्यादीचे डावे हातावर डावे पायावर तसेच उजवे बरगडीजवळ मारून जखमी केले. फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील अपराध क्रमांक 326/2024 कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506 भादंवि सहकलम 4, 25 भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयातील मुख्य आरोपी यश पराते व त्याचा साथीदार अंकुश तिरपुडे वर्धेतील सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर शरीराविरूध्द पो.स्टे. रामनगर, वर्धा शहर, सावंगी येथे बरेच गुन्हे दाखल आहे. ते घटना तारखेपासुन मागील 02 महीने पसार होते. अॅटी गॅग सेल स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा हे त्याचा वारवांर शोध घेत होते आरोपी रेकॉर्डवरील असल्याने ते त्यांची अटक चुकवित होते. सदर आरोपीतांचा शोध सुरू असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून गुन्हयातील दोन्ही आरोपी हे पुणे जिल्हयात राहत असल्याबाबत गोपनिय माहिती अॅटी गॅग सेलला मिळाली.

सदर दोन्ही आरोपी हे पोलीस स्टेशन सावंगी अप. क्रमांक 325/2024 कलम 341, 504,506,34 भादवि चे गुन्हयात पसार असुन आरोपी 1) यश उर्फ प्रसाद पराते, वय 23 वर्ष, रा. अग्नीहोत्री कॉलेजजवळ, रामनगर, वर्धा, हा पोलीस स्टेशन वर्धा शहर अप. क्रमांक 1417/2023 कलम 307, 452, 143,147,148, 149, 504,506 भादंवि सहकलम 4, 25 भादंवि गुन्हयात सुध्दा पसार आहे. तसेच आरोपी 2) अंकुश गजानन तिरपुडे, वय 23 वर्ष, रा. हिंदनगर वर्धा हा 01 वर्षा करीता स्थानबध्दतेवरून सुटून आल्यानंतर लगेच 10 दिवसानंतर पो.स्टे. सावंगी मेघे येथे गुन्हा करून पसार झाला होता.

त्यानुसार सदर गुन्हयातील दोन्ही आरोपी यांचे ठाव ठिकाण्याबात कोणताच सुगावा नसतांना तांत्रिक पध्दतीने आरोपीतांचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे पुणे जिल्हयात, पिंपरी चिंचवड, रावेत, हिंजवडी, वाकड परिसरात असल्याची माहीती मिळाली. अॅटी गॅग सेल स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथक यांनी सतत 06 दिवस सदर ठिकाणी रेकी करून ए.टी.एम. मशीन, हॉटेल, लॉजेस, पान टपरी, हॉटेल पब असे अंदाजे 100 ते 125 ठिकाणे चेक केले असता आरोपी 1) यश उर्फ प्रसाद पराते, वय 23 वर्ष, रा. अग्नीहोत्री कॉलेजजवळ, रामनगर, वर्धा, 2) अंकुश गजानन तिरपुडे, वय 23 वर्ष, रा. हिंदनगर वर्धा हे वाकड परिसरात एका रेस्टॉरंट मध्ये जेवन करतांना मिळुन आले. त्यांना मोठ्या शिताफितीने ताब्यात घेवून आज दिनांक 04/07/2024 रोजी वर्धा येथे आणुन पसार असलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनात व मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, यांच्या निर्देशनात पोलीस उपनिरीक्षक, श्री. अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये