ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करणार

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  उपबाजार आवार चंदनखेडा या हद्दीत विनापरवाना व्यापाऱ्यांनी खेडा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये.अन्यथा असा प्रकार आढळल्यास त्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत  नुकत्याच आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या   बैठकीत घेतलेला आहे.

        स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाठविलेल्या पत्रकात असे नमुद करण्यात आले की,  शेतकऱ्यांचे सोयाबीन, धान,तुरी,व चना या मालाचे खरेदी- विक्रीचे व्यवहार उपबाजार आवार,चंदनखेडा येथे लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. काही  व्यापारी मंडळींकडून  विनापरवाना शेतकऱ्यांना भुलथापा देऊन निघालेला माल खरेदी करण्याचा प्रकार तालुक्यातील काही भागात सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती ,भद्रावतीचे उपबाजार आवार,चंदनखेडा हद्दीतील व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती  अश्लेषा (भोयर) जीवतोडे आणि सर्व संचालक तसेच  सचिव  नागेश पुनवटकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात  आली.

उपबाजार आवार,चंदनखेडा येथे लवकरच शेतमालाच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.खेड्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यात सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला जातो. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी भद्रावती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती,भद्रावतीचे उपबाजार आवार, चंदनखेडा येथे विक्रीस आणावा, यासंबंधीच्या सुचना शेतकरी बांधव आणि  व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती सभापती  भास्कर ताजने ,उपसभापती अश्लेषा (भोयर ) जीवतोडे व सचिव नागेश पुनवटकर यांनी संयुक्तपणे  दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये