Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तनिष्का शालिकराव देवगडे राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र

चांदा ब्लास्ट

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद ,चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ ते ५ ऑक्टोबर २०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे घेण्यात आले होते. यात चांदा पब्लिक स्कूलची

विद्यार्थिनीने विजय पद प्राप्त करून राज्य स्तराकरिता आपले नाव नोंदवीले . तनिष्का देवगडे हिने अनेक शाळांना मागे टाकत राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेत विविध जिल्हयातील २५० ते ३०० विद्यार्थ्यांचा समावेश होता, त्यात चंद्रपूरातील वयोगट १७ वर्षा आतील ही एकमेव विद्यार्थीनी आहे हे येथे उल्लेखनीय. १७ वर्षातील मुली तनिष्का शालिकराव देवगडे राज्यस्तरीय स्पर्धेत ही नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे .

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी नागपूर विभागाचे (चंद्रपूर जिल्ह्याचे ) व शाळेचे नाव लौकिक करावे. अशा शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आम्रपाली पडोळे यांनीदेखील विद्यार्थिनीला पुढील राज्य स्तरीय स्पर्धेत यशाकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये