रोटरीच्या वतीने जागतिक पोलिओ दिन साजरा

चांदा ब्लास्ट
रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने २४ ऑक्टोंबर हा जागतिक पोलिओ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने पोलिओवर मात केल्याचे सांगितले.
चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जागतिक पोलिओ दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विपिन पालिवाल उपस्थित होते. मंचावर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, रोटरी क्लबचे सचिव कुंजबिहारी परमार, अजय पालारपवार, प्रदीप पवार उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त विपिन पालिवाल यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. तसेच पोलिओ अभियानाची जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त पालिवाल यांनी जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताने पोलिओ आजारावर लसीकरणाच्या माध्यमातून मात केल्याचे सांगितले.
शहरी तसेच ग्रामीण भागात अतिशय नियोजनबध्द पध्दतीने लसीकरण अभियान राबविण्यात आले. त्यामुळेच आपण या आजारावर मात करू शकलो, करोना संक्रमणाचा देखील आपण अशाच पध्दतीने सामना केल्याचे पालिवाल यांनी सांगितले. रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पोलिओ निर्मुलनाची माहिती दिली. तर रोटरी अध्यक्ष अनुप यादव यांनी प्रास्ताविक भाषणात रोटरीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यांची माहिती दिली. यावेळी आयुक्त पालिवाल यांच्या हस्ते रोटरी उत्सव २०२३ च्या बॅनरचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप पवार यांनी केले तर आभार सचिव कुंजबिहारी परमार यांनी मानले. कार्यक्रमाला रवींद्र जैन, राम चांदे, महेश उचके, अशोक हासानी, अरूण तिखे, अजय जयस्वाल, सचिन गांगरेड्डीवार, संजय उपगन्लावार, अनुपमा भामरी, श्रीकांत रेशीमवाले, तेलंग, नविन चोरडीया, अविनाश रघुसे,अनुप बोरडे, उत्तम डाखरे, मिलिंद बोडखे, नरेंद्र बुरांडे, अभय झाडे, अविनाश उत्तरवार, मनिष बोराडे उपस्थित होते.