Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एबीपीएस, माणिकगढ द्वारा आयोजित समुदाय आउटरीच कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल (माणिकगड), गडचांदूर यांनी जवळच्या नोकारी (खुर्द) गावात सीबीएसई हब ऑफ लर्निंगच्या बॅनरखाली एक समुदाय आउटरीच कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला यामध्ये नारायण विद्यालय, बीजेएम कारमेल, सेंट ऐनी,वरोरा, श्री महर्षी विद्या मंदिर, चांदा पब्लिक स्कूल, बजाज विद्या भवन चंद्रपूर यांनी सहभाग घेतला.

एबीपीएस माणिकगड इको क्लब तर्फे हा एकदिवसीय समुदाय पोहोचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात नोकारी (खुर्द) गावात स्वच्छता रॅलीने झाली या अंतर्गत सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेऊन कचरा व प्लास्टिक डस्टबीनमध्ये जमा करून परिसर स्वच्छ केला. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

स्वच्छता रॅलीनंतर सहभागी ग्रामीण जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात, नोकारी (खुर्द) येथे एकत्र आले, जिथे अंधश्रद्धा, आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि सामुदायिक स्वच्छता या विषयावर विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल कचरा वेगळे करण्यावर पथनाट्य सादर करण्यात आले. गडचांदूर येथील वनविभागाचे राउंड अधिकारी श्री.टोंगे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वनजीवन आणि जैवविविधतेवर प्रकाश टाकला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या गटासह 2018 मध्ये एव्हरेस्टवर चढाई करणारे सुप्रसिद्ध श्री विकास सोयाम यांनी आपले मौल्यवान अनुभव सांगितले. बांबू कलाकार पी.जे. मडावी यांनी पारंपरिक टोपली विणण्याची कला विद्यार्थ्यांना दाखवून दिली.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून एफएच एचआर यूटीसीएल ,एमसीडब्लू चे मुकेश गेहलोत व नवीन कौशिक, एबीपीएस च्या प्राचार्या सौ. अर्चना गोलचा, गावच्या सरपंच मनीषा, उपसरपंच वामन तुरणकर, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इको क्लबचे प्रभारी डॉ.एस.चुन्ने, विज्ञान विभाग प्रमुख मोरेश्वर भांगे, सौ.दीपमाला सिंग, सौ.सीमा दुबे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये