Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ने.ही. महाविद्यालयातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी – वन्यजीव सप्ताह २०२३ निमित्याने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ०४ ऑक्ट. रोजी तपाळ जंगल परिसरात वन विभाग ब्रम्हपुरी व अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेसोबत विद्यार्थ्यांसाठी वन भ्रमंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वन भ्रमंती दरम्यान उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.सचिन नरड व क्षेत्र सहाय्यक सेमस्कर,अर्थ कंजरवेशन संस्थे तर्फे मनोज वठे यांनी विद्यार्थ्यांना वनविभागाच्या अनेक कार्याविषयी व जंगलातील वनस्पती,पशू पक्षांची माहिती दिली.

दिनांक 05 ऑक्टो. रोजी महाविद्यालयात डब्लू डब्लु एफ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मध्यभारताचे प्रकल्प प्रमुख,मानद वन्यजीव रक्षक नागपूर श्री.अजिंक्य भटकर यांच्या सोबत विद्यार्थ्यांसाठी “वन्यजीव संवर्धन व धोका” या विषयावर विस्तृत चर्चासत्र आयोजित करण्यात आला होता.या चर्चेत महाराष्ट्र राज्यातील जैव विविधता त्यांचे संवर्धन तसेच संवर्धन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, वन्यजिवांना उद्भवणारे धोके ई. विषयावर अजिंक्य भटकर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी.एच. गहाणे, डॉ.कानफाडे मॅडम, डॉ.रंगारी मॅडम,डॉ.मुंगोले सर उपस्थितीत होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जयेश हजारे,प्रा.धीरज आतला, प्रा. एन सिंह, प्रा. भोयर,प्रा उरकुडे, प्रा.राऊत, प्रा.वंजारी यांनी विशेष मेहनत घेतली.

“जैवविविधता संवर्धन हे आपली सामाजिक जबाबदारी असून भविष्यात निसर्ग आणि मानव यांचे नाजूक संबंध जोडणारा महत्वाचा दुआ आहे”

-प्राचार्य डी.एच.गहाणे

“वन्यजीव सप्ताह साजरा करून, आम्ही केवळ संवर्धनाच्या गंभीर गरजेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवत नाही तर विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रेरित करतो. शाश्वत विकास पद्धती, जबाबदार पर्यटन आणि वन्यजीव-अनुकूल धोरणांना प्रोत्साहन देण्याची ही एक संधी आहे.”

– प्रा.जे डब्लु हजारे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये