ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रस्त्याच्या बाजूचे नाली खोदकाम नागरिकांसाठी धोकादायक ?
अनेक दिवसा पासून काम थंडबस्त्यात!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रम्हपुरी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते फवारा चौक कडे जाणाऱ्या रस्त्या दरम्यान जुनी पायीप नाली चे खोदकाम करण्यात आले आहे.
सदर चा रस्ता हा अरुंद असल्याने हे नाली खोदकाम येथून प्रवास करणाऱ्यांना धोकादायक ठरत आहे.याच रस्त्यावर जिल्हा परीषद क्रमांक 3 ही लहान मुलांची शाळा तसेच मुख्य लोकवस्ती असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रम्हपुरी नगरपालिका प्रशासनाने या कडे वेळीच लक्ष देऊन नाली बांधकाम करणाऱ्या सबंधित ठेकेदाराला या खोदकामाचे जागी सुरक्षा कठडे लावण्याच्या सूचना द्याव्या तसेच लवकरात लवकर सदरचे काम पूर्ण कसे होईल या बाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.