Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबुजा कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचे टॉवरवर चढून वीरू गिरी आंदोलन

तब्बल 16 तासानंतर आंदोलक टॉवर वरून खाली उतरले ; गो बॅक अंबुजा, गो बॅक अदानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात टॉवरवर चढुन विरुगिरी आंदोलन येथील प्रकल्पग्रस्तांनी केले आहे.

अंबुजा सिमेंट कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी भुसंपादित केल्या परंतु अजून पर्यंत त्यांना नोकरी दिली नाही व त्यांच्या जमिनी ही परत केलेल्या नाही. आम्हाला हक्काची नौकरी द्या नाहीतर आम्हची जमीन परत करा यासाठी गो बॅक अंबुजा, गो बॅक अदानी नारे देत पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान प्रकल्पग्रस्त आकाश लोडे, संदीप वरारकर, संजय मोरे, तुषार निखाडे, अविनाश विधाते, सचिन पिंपळशेंडे टॉवर वर चढत आंदोलन सुरू केले आहे.

अंबुजा सिमेंट कंपनीने भूसंपादन कराराचा भंग केला, प्रकल्पाग्रस्तांना नोकरी दिली नाही. ४ वर्षापूर्वी भूसंपादन व पुर्नवसन उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सिद्ध झालेले आहे. तशी शासनाने कंपनीला ४ वर्षापूर्वी कारवाईची नोटीस पाठविली होती. मात्र सरकार ४ वर्षापासून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. नियम धाब्यावर बसवून अंबुजा कंपनीचा बचाव करत आहे. चौकशीतील अहवालाप्रमाणे कंपनी विरुद्ध भूसंपादन रद्द करण्याची कारवाई करावी किंव्हा आम्हाला स्थायी नौकरी द्यावी. अन्यथा आमच्या जीवाचे कमीजास्त झाल्यास कंपनी व्यवस्थापन व सरकार जबाबदार राहणार म्हणून आंदोलन करत असल्याचे कळविले.

तब्बल 16 तासानंतर प्रशासन कडून ठोस आश्वासन मिळाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले, ठाणेदार रविंद्र शिंदे,तहसीलदार प्रकाश व्हटकर ,कंपनी व्यवस्थापन यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये