भद्रावतीत पुरुषांची खुले हॉलीबॉल स्पर्धा
नवोदय स्पोटिंग क्लबचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील नवोदय स्पोर्टिंग क्लबच्या वतीने दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भव्य खृली पुरुष हॉलीबॉल स्पर्धा स्थानिक किल्ला वार्ड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक 21 फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन भद्रावती वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या शुभहस्ते तर शिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी,चंद्रपूर जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद आवटे, सचिव सुनील आखाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर स्पर्धेत नागपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, चंद्रपूर, मुंबई, यवतमाळ आधी संघ सहभागी होणार असून या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 41 हजार रुपये द्वितीय 31 हजार तर तृतीय 21 हजार रुपये रोख व चषकासह मॅन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट समॅशर, बेस्ट लिफ्टर, ब्लॉकर, बेस्ट डिफेन्सर, बेस्ट सर्विस आदि आकर्षक गिफ्ट देण्यात येणार असून दिनांक 23 फेब्रुवारी सायंकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा होणार असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते मुकेश जीव तोडे, ठाणेदार अमोल काचोरे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी,संतोष आमने, सुधीर सातपुते, चंद्रकांत खारकर, राजीव सारंगधर, विनोद वानखेडे, अमित गुंडावार, प्रवीण सातपुते आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता अध्यक्ष प्रवीण मत्ते, उपाध्यक्ष दिनेश उलमाले, सचिव प्रफुल चटकी, गोपिक भोयर, अभिषेक काकडे,प्रणय पतंरगे,नितीन जगताप, विनोद काळे, आशिष काळे, शुभम बोरकुटे आदींसह नवोदय स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहे.