ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २२ डिसेंबरला

चांदा ब्लास्ट

आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक अर्ज दाखल केलेल्या सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या मुलाखती येत्या २२ डिसेंबर रोजी (सोमवार) दुपारी 2 वाजेपासून आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉन सभागृहात पार पडणार असून त्या दिवसभर चालणार आहेत.

या मुलाखती पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून, यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, उमेदवार, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, यांच्यासह पक्ष निरीक्षक व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूर शहरातील विविध प्रभागांतून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या ज्यांनी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली दावेदारी सादर करावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये