ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३६५ दिवस चालणाऱ्या पालडोह शाळेची विभाग स्तरावर निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- २७ सप्टेंबर २०२३ ला राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प जिल्हा स्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,बाबूपेठ ,चंद्रपूर येथे पार पडली.लोक अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील शाळेने सहभाग घेतला. यात पालडोह या ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेने आपला सहभाग लोकनृत्य या स्पर्धेत सहभाग घेतला.

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुके सहभागी झाले होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह पं स जिवती ने आसामी लोकनृत्य बिहू या गाण्यावर पर्यावरण संरक्षण हा विषय घेऊन आपला सहभाग घेतला होता.त्यात त्यांनी जिल्हा स्तरावर स्पर्धा उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. विभाग स्तरावर चंद्रपूर चे नेतृत्व आता पालडोह ही शाळा करणार आहे. यात इयत्ता ८ वी च्या कु दिव्यांक बाजगिर,संचिता चव्हाण,पूजा सोनवळे, पायल चव्हाण,माधुरी रुंजे व प्रतीक्षा आईतवाड या सहा विद्यार्थीनी सहभाग घेतला होता.

या वेळी शाळेचे सहकारी व मार्गदर्शक शिक्षक पानघाटे, रत्नमाळ,शेख,वेलादी, शिक्षण प्रेमी शेख यांनी मुलांचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक परतेकी यांनी सुद्धा मुलांचे अभिनंदन करत विभाग स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गावातील पालक,शालेय व्यवस्थापन समिती ने सुद्धा त्यांचे कौतुक केले.

पंचायत समिती जिवती मधील गट विकास अधिकारी डॉ रिजेवाड,गट शिक्षण अधिकारी झोडे व संपूर्ण साधन व्यक्ती यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पालडोह येथील मुलांचे व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये