ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदी सतीश बिडकर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख आमदार बच्यु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी सतिश बिडकर व शेरखान पठाण यांची तर प्रहार च्या दिव्यांग संघटना च्या जिल्हा अध्यक्ष पदी पंकज माणुसमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्युभाऊ कडू हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करून नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे, संजय गोमकाळे, अतुल निमरड,अमित बहादूरे, अक्षय बोन्दगुलवार,गणेश उराडे, संदीप झाडे,विशाल कुडे, अमोल दातारकर,हर्षल ढोके, अमोल काटकर,ओंकार कांबळे,परमेश्वर वाघमारे, अनुप राखून्डे, नितेश कोडापे,व इतर उपस्थित होते.

आगामी काळात प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्यु कडू यांचे विचार शहरी व ग्रामीण भागात रुजविण्यासाठी सतत कटिबद्ध राहून पक्षाची मजबुत बांधणी करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष सतीश बिडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये