Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या गडचांदूर ची वार्षिक आमसभा नुकतीच पार पडली,यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर कोल्हे होते तर प्रमुख अतिथी व सत्कार मूर्ती म्हणून प्राचार्या स्मिताताई चिताडे,सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार,सेवानिवृत्त पर्यवेक्षक हनुमान मस्की,पतसंस्थेचे सचिव प्रशांत धाबेकर,कोषाध्यक्ष राजू गोखरे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे संचालक प्रा पवन चटारे,सौ गायीत्री पिंपळकर,प्रा प्रदीप परसुटकर,शामकांत पिंपळकर,प्रभाकर काकडे,कु प्रतिभा गेडाम पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रमोद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्या बद्दल महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे व महात्मा गांधी विध्यालयातून सेवानिवृत्त झाल्या बद्दल उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक हनुमान मस्की यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थी म्हणून गोपाल पोटे,आचल राठोड, साहिल निर यांचाही सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्रशांत धाबेकर यांनी केले अहवाल वाचन प्रमोद काळे यांनी केले.

संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले याप्रसंगी पतसंस्था चे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये