ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावलीत ओबीसींचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तहसीलदार मार्फत निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

चंद्रपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र टोंगे यांच्या 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपोषण, आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात येत आहे.ओबीसी समाजाच्या प्रमुख न्यायिक मागण्या घेऊन आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका सावलीच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

सध्या चंद्रपूर तसेच महाराष्ट्रात ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष असून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, बिहार सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीचे मुला-मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यात यावे, महाराष्ट्र सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावलीच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करून सावली तहसीलदार मार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावलीचे तालुकाध्यक्ष श्री कवींद्र रोहणकर भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश पाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव भाऊराव कोठारे किशोर कारडे नितीन गोहणे पितांबर वासेकर ईश्वर गंडाटे किशोर घोटेकर प्रकाश गड्डमवार मोतीराम चिमूरकर नागोराव कोठारे नितीन पाल अनिल मशाखेत्री द्रोपद पिपरे केशव भरटकर श्रीकांत बहिरवार अर्जुन भोयर मंगेश गोहने युवराज झाडे विनोद धोटे अक्षय यलमवार सतीश बोम्मावार श्रीधर सोनुले अंकुश भोपये संजय सातपुते विकास आभारे नीलम सुरमवार सौ.मनीषा चिमुरकर सौ.शोभाताई बाबानवाडे सौ. प्रतिभाताई बोबाटे तसेच असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये