ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्या स्मिताताई चिताडे यांची स्वच्छता दुत म्हणून केली नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिताताई अनिलराव चिताडे यांचा नगर परिषद, गडचांदूर च्या वतीने 21 सप्टेंबर ला नगराध्यक्षा सौ सविताताई टेकाम यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छता अभियान अंतर्गत नगर परिषद च्या स्वच्छता दुत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी,गटनेते तथा सभापती विक्रम येरणे,नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्या स्मिता चिताडे यांनी नियुक्ती केल्या बद्दल नगर परिषद चे आभार मानले असून नगर परिषद व ग्रामस्थांच्या सहकार्य ने स्वच्छ व सुंदर गडचांदूर शहर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे,प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये