Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उन्हाळी २०२३ सर्व अभ्यासक्रमांच्या परिक्षेत केवळ २२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेशाची निर्माण झाली गंभीर समस्या

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठाचा शिक्षणाचा दर्जा दिवसेन दिवस खालावत चालला आहे. विद्यापीठाकडून उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहे. यात ५२,००० विद्यार्थी अनुत्तीर्ण तर केवळ २२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. अतिशय धक्कादायक अशा या निकालात केवळ २९ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले असून ७१ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहे.

विद्यापठातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेशाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. उन्हाळी २०२३ परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्र २०२३- २४ करिता सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व सेमिस्टर मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यापीठ विकास मंचाचे व्यवस्थापन परिषद -अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी मागणी रेटून धरलेली होती.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या गंभीर समस्या कडे विद्यापीठाचे लक्ष वेधण्यासाठी ७ सप्टेंबर २०२३ च्या व्यवस्थापन परिषदेत गुरुदास कामडी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये प्रवेश देण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या गंभीर समस्येकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर विद्यापीठ प्रशासनाने विद्या परिषदेच्या तातडीच्या बैठकीत उन्हाळी २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण ५२,००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता विशेष संधी म्हणून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक २१ सप्टेंबर २०२३ च्या परिपत्रकानुसार कँरी फारवर्डच्या पध्दतीनुसार शैक्षणिक सत्र २०२३-२४ करीता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ विकास मंचाचे व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये