ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न.प.श्री .शिवाजी हायस्कुलच्या खेळाडूची मैदानी स्पर्धेत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र,राज्य पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद बुलडाणा यांचे संयुक्त विघमाने जिल्हास्तरीय विविध मैदानी क्रिडा स्पर्धा दि.०८आॕक्टोंबर ते ०९ आॕक्टोंबर २०२४रोजी जिल्हा क्रिडा संकुल बुलडाणा येथे संपन्न झाल्या. या मध्ये स्थानिक छञपती श्री. शिवाजी महाराज नगर परिषद तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगांव राजा या शाळेच्या खेळाडूंनी विविध खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत यश संपादन केले.

यामध्ये  नरेंद्र दुनगहु – याने १४ वर्षे वयोगटात गोळा फेक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला.

जय बो-हाडे – याने १७ वर्षे वयोगटात ,1500 व 3000 मीटर धावणे स्पर्धेत जिल्हातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

माधुरी गाडेकर – हिने मुलींच्या मैदानी स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात तिहेरी उडी मध्ये जिल्हातुन तृतीय क्रमांक प्राप्त केला.

     वरील तीन खेळाडुची यवतमाळ येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. असुन या घवघवीत यशाबद्दल नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. अरुण मोकळ, व शाळेचे प्राचार्य संजय देशमुख, उप प्राचार्य विजय अव्हाणे, तालुका क्रिडा संयोजक राजेश सपाटे, संजय मगर खेळाडूचे पालक संजय दुनगहु व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षक्तेर कर्मचारी वृंदानी प्रशिक्षक अनिल दंदाले, खंडागळे सर यांचे व विजयी खेळाडूचे अभिनंदन केले.

व विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये