ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त डॉ.अभ्युदय मेघे यांनी केले विठ्ठुरायांचे पूजन., वारकऱ्यांचा केला सत्कार

500 किलो फराळ वाटप हजारो भाविकांनी घेतला प्रसादचा आनंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील घोराड येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन डॉ.अभ्युदय मेघे यांनी पूजन केले.अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सर्वांच्या सुख समृद्धीसाठी व शेतकरी बांधवांच्या पीकला योग्य हमीभाव मिळावा तशेच सर्व नागरिकांचे निरोगी आरोग्य रहावे यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.

दरवर्षी वर्धेतून पंढरपूरला पायी वारीत अनेक वारकरी जातात. यातील काही भाविकांचे यावर्षी पंढरपूरला काही कारणाने जाणे झाले नाही अश्या अनेक वर्ष वारी केलेल्या वारकऱ्यांचा डॉ. अभ्युदय मेघे यांच्या विशेष उपस्थितीत त्यांनी वारकऱ्यांचे आशीर्वाद घेत त्यांना शाल,श्रीफळ, व वरून राजापासून बचावासाठी एक छत्री भेट स्वरूपात देऊन सन्मान केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय या वारकऱ्यांच्या नेहमीच सोबत आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना देखील यावेळी त्यांनी केली. पुढील काळात वारकऱ्यांसाठी आमच्या मेघे फाउंडेशन च्या वतीने जे जे काय करता येईल तेथे मी करण्यास नेहमी त्यांच्या सोबत असेल असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.

यावेळी परिसरातील नागरिकाना साठी फराळ वाटपाची व्ययस्था वर्धा सोशल फोरम तर्फे देखील करण्यात आला. दिवसभर मंदिर परिसरात नागरिकांसाठी फराळ वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. याचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांनी घेतला.

वारकरी सुनिता महाकाळकर,गंगुबाई चंदनखेडे, चंदा म्हस्के, सुगंधाबाई तेलरांधे, माधव झाडे, केशवराव मांडवकर, सूर्यवंशी धोंगडे, चंदा तडस, लक्ष्मीबाई झाडे, महादेव हांडे, शुद्धकला राऊत,चंद्रकला माहुरे, गंगुबाई माहुरे,भैया तडस,यशोदा सुपारे,पांडुरंग वरटकर या वारकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिशूल राऊत, गंगाधर तडस यांचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये