ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेन्ट ॲन्स हायस्कूल सुमठाणा येथे जागतिक चालक दिन साजरा

हायस्कूलने केला ऑटो चालकांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

शहरातील सेन्ट ॲन्स हायस्कूल सुमाठणाच्या विद्यमाने जागतिक दिनाचे औचित्य साधून दि. १७ सप्टेंबरला हायस्कूलच्या सभागृहामध्ये जागतिक चालक दिन विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यत्वे दररोज शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या ऑटो चालकांचा हायस्कूल तर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम स्वागत गीताने मंचावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या जागतिक चालक दिनाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रशिक ताठे हे होते तर ॲड.मिलिंद रायपुरे ,शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर सबीना मॅथ्युज,मुख्याध्यापिका सिस्टर ग्रेसी थॉमस, उपमुख्याध्यापिका सिस्टर ऍगस्टीन,निखिल मेश्राम, ऑटो युनियन अध्यक्ष बाळू उपलांचीवर, प्रकाश मेंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व ऑटो चालकांचा शाळेतर्फे आकर्षक भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ऑटो चालकांनी मनोरंजनात्मक खेळ, नृत्य, गायन आदी प्रकारात सहभाग दर्शवून आपल्या सुप्त गुणांचा परिचय करून दिला. याप्रसंगी मुख्याध्यापिका ग्रेसी सिस्टर ग्रेसी थॉमस, वरिष्ठ शिक्षक सुनील बावणे, सूत्राताई करमनकर, यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ऑटो चालकांतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले समायोचित विचार व्यक्त विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक सुनील बावणे, संचालन स्मिता देहारकर तर आभार प्रदर्शन प्रियंका मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता हेमंत वाढई, किशोर सर, मनोज सर, रॉबर्ट सर, सौरभ सर, ऑटो युनियनचे श्रीराम रुयारकर व आदींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये