Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसेच वाहतूक नियंत्रण शाखा हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट बाईक रॅलीचे* आयोजन करण्यात आले. टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी हेल्मेट बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

बाईक रॅलीवेळी सुमारे 60 वाहन चालक उपस्थित होते. बाईक रॅली ची सुरुवात विश्रामगृह हिंगणघाट येथून तुकडोजी पुतला कारंजा रोड आंबेडकर पुतळा ते परत विश्रामगृह नेण्यात आली. बाईक रॅली नंतर सर्व नागरिकांना रस्ता सुरक्षा चे धडे देण्यात आले. यावेळी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत वाहन चालक सुबोध तायडे आणि विकी सातपुते सोबत बालु किटकुले तसेच वाहतूक नियंत्रण शाखा येथील पीएसआय भारत वर्मा, एएसआय संजय त्रिपाठी,पोलीस नाईक गजू कामठाणे स्वप्निल निंदाने, हिंगणघाट ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक राजेश घोडे, विजय तामगाडगे, सुरेंद्र आग्रे यांचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये